मेक्सिकोत ७.१ रिश्टर स्केल भूकंप,१३८ जणांचा मृत्यू
मेक्सिको : मेक्सिकोची राजधानी असलेल्या मेक्सिको सिटीमध्ये ७.१ रिश्टर स्केल भूंकप झाला असून यात १३८ जणांचा मृत्यू झाला आहे. भूकंपामुळे जमीनदोस्त झालेल्या इमारतीच्या ढिगाऱ्याखाली अनेकजण अडकले असल्याची भीती मेक्सिकोच्या गव्हर्नरांनी व्यक्त केली आहे.
भारतीय वेळेनुसार रात्री 11. 45 वाजता हा प्रलंयकारी भूकंप झाला. या भूकंपामुळे तब्बल 44 इमारती जमीनदोस्त झाल्याचं मेक्सिकोच्या गव्हर्नरांनी सांगितलं. भूकंपाचा केंद्रबिंदू मेक्सिकोपासून प्यूब्ला राज्यातील चियाउतला डी तापियापासून सात किलोमीटर पश्चिमेला होता. या भूकंपानंतर मेक्सिको शहर विमानतळावरील सर्व विमान फेऱ्या रद्द करण्यात आल्या आहेत. अमेरिकन जिओलॉजिकल सर्व्हेनुसार, य भूकंपाचा केंद्रबिंदू ५१ किलोमीटर खाली होता. एकट्या मोरलियोस राज्यात ५४ लोक मृत्यूमुखी पडले आहेत. तर पुएब्लोमध्ये २६ लोक मृत्यूमुखी पडले आहेत. प्रशासनाकडून बचावकार्य युध्दपातळीवर सुरू आहे.