विजय मल्ल्याला अटक आणि जामीन
भारतातील बँकांच सुमारे ९ हजार कोटी रूपये थकवून फरार झालेल्या विजय मल्ल्याला लंडनमध्ये अटक करण्यात आली मल्ल्याला एका वर्षात देानदा अटक करण्यात आली आहे मात्र अटकेनंतर त्याला जामीनही मिळाला आहे,
सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) मल्ल्याविरोधात देशात आरोपपत्र दाखल केले आहे काही तासांतच मल्ल्याची जामिनावर सुटका झाली होती.किंगफिशर प्रकरणात विजय मल्ल्यावर कोट्यवधींचं कर्ज आहे. बँकांकडून घेतलेल्या कर्जाची परतफेड न केल्याचा मल्ल्यावर आरोप आहे. मल्ल्याकडून एसबीआय बँकेला 6 हजार 963 कोटींची किंमत येणं अपेक्षित आहे. यापूर्वी आयडीबीआय बँकेचं कर्ज चुकवण्यासाठी ईडीने 1411 कोटींची संपत्ती जप्त केली होती.