मुंबई : लोकसभेसाठी उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षाने आज पक्षाचा वचननामा जाहीर केला पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांच्या हस्ते वचनामा जाहीर करण्यात आला या वचननाम्यात अनेक घोषणा केल्या आहेत.
ठाकरे गटाच्या वचननाम्यात काय?
- राज्यात चाललेली लूट थांबवू, महाराष्ट्राचं वैभव वाढवू.
- वित्तीय केंद्र नव्याने उभारू, युवकांना नोकरीच्या संधी देऊ.
- जिल्हा रुग्णालये अद्यायावत करू.
- ग्रामीण भागात, प्राथमिक उपचार केंद्र आधुनिक करणार.
- शेतकऱ्यांना कर्जमुक्त करु, पीकविमाचे निकष बदलू.
- बी बीयाणे, खतं यांच्यावरील जीएसटी मुक्त करु.
- तसंच, शेतकऱ्यांना गोदामं, शितगृह देऊ.
- कृषीखात्यात सर्व्हे करणारं विभाग स्थापन करून, ज्या पिकाला मागणी आहे, तेच पीक घ्यायला सांगणार त्याला
- हमीभाव शेतकऱ्यांना देणारच
- उद्योग स्नेही वातावरण राज्यात निर्माण करू, पर्यावरण स्नेही उद्योग आणू
- सत्तेचं विकेंद्रीकरण करु
- कर दहशतवाद थांबवू
- जीएसटीमधील त्रासदायक अटीशर्थी आर्थिक सल्लागारांशी बोलून थांबवू
- सरकारी नोकऱ्यांमध्ये महिलासांठी 50 टक्के जागा देणार, सुरक्षा देणार.
- मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळवून देऊ.
- जीवनावश्यक वस्तूंचे भाव पाच वर्षे स्थीर ठेवण्याचा प्रयत्न करू.