मुंबई : गुढीपाडवा सण आणि दसरा मेळाव्यात  इतिहासाची मोडतोड करून धर्म भावना दुखावणारे विधाने केल्याचा आरोप करत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना कायदेशीर नोटीस बजावण्यात आली आहेण, ही नोटीस सौरभ ठाकरे पाटील आणि तेजस बैस यांच्यातर्फे अँड असीम सरोदे यांनी पाठवली आहे. याप्रकरणी शिंदे यांनी सात दिवसात लेखी माफीनामा पाठविण्यात यावा असेही नोटीसीत नमूद करण्यात आले आहे. 

 दि. ९ एप्रिल रेाजी ठाणे येथील गुढीपाडवा कार्यक्रमात मुख्यमंत्री शिंदे माध्यमांशी सवांद साधताना  प्रभू रामचंद्राने रावणावर मिळवलेल्या विजयानिमित्त हा सण साजरा करतो आणि संपूर्ण देशभर हा सण उत्सवात साजरा होतो अस विधान शिंदे यांनी केलं होतं. या विधानावरून  या नोटीसीत आक्षेप घेण्यात आला आहे.  हे विधान अत्यंत हास्यास्पद आहे. कारण प्रभू श्रीरामाचा रावणावरील विजय हा दिवस दसरा म्हणून साजरा केला जात असताना गुढीपाडव्याला दस-याचं नाव दिल्याने हिंदूंच्या भावना दुखावल्या गेल्या आहेत असे नोटीसीत नमूद करण्यात आले आहे. 

तसेच या नोटिसीत शिंदे यांच्या दस-या दिवशी झालेल्या बीकेसी येथील सभेचा उल्लेख करण्यात आला आहे त्यावेळी केलेल्या भाषणात त्यांनी महादजी शिंदे आणि दत्ताजी शिंदे  हे छत्रपती शिवाजी महाराजांसोबत लढले आणि शहीद झाले असं विधान केलं होतं हे विधान चुकीचे आणि इतिहासाचा विपर्यास करणार आहे कारण छत्रपती शिवाजी महाराज आणि महादजी व दत्ताजी शिंदे या तिन्ही ऐतिहासीक व्यक्तिमत्वांच्या काळात फरक आहे त्यामुळे हे विधान इतिहासाची अक्षम्य मोडतोड आहे असं या नोटीसीत नमूद करण्यात आलं आहे. 

हिंदुत्वाच्या मुद्दयावरून एक प्रादेशिक पक्ष फोडून त्यावर मालकी स्थापन करताना आणि हिंदुत्व हा शब्द वापरणा-या व्यक्तिला हिंदू सणाची साधी माहिती असू नये हे खेदजनक असल्याचं नोटीसीत म्हटलं आहे. त्यामुळे आपल्या विधानाने हिंदूंच्या भावना दुखावल्याने नोटीस मिळाल्यापासून सात दिवसाच्या आत दोन्ही चुकांसाठी जाहीर माफी मागत लेखी माफीनामा पाठवावा अशी नोटीस बजावण्यात आली आहे. 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!