मुंबई : बजाज कंझ्युमर केअरने 20 जून रोजी बजाज १०० टक्के शुद्ध मेंदींचा ‘हिना’ हा ब्रॅण्ड बाजारात आणला आहे. उत्कृष्ट दर्जाच्या मेंदीच्या पानांपासून बनविलेले आणि पुर्णपणे रसायनविरहीत असलेले हे उत्पादन १०० टक्के नैसर्गिक आणि पूर्णपणे सुरक्षित आहे. हि मेंदी हात आणि पायांवर देखील वापरता येऊ शकते आणि ती खरोखर बहुउद्देशीय सौंदर्य आविष्काराचा अविभाज्य घटक ठरली आहे.

बजाज कंझ्युमर केअरचे व्यवस्थापकीय संचालक जयदीप नंदी यांनी माहिती देताना सांगितले की, बजाजची १०० टक्के शुद्ध मेंदी हे एक नाविन्यपूर्ण उत्पादन आहे. हि मेंदी ग्राहकांना त्यांच्या केसांना कंडीशन करण्यासाठी तसेच समृद्ध नैसर्गिक रंग प्रदान करण्यासाठी १०० टक्के नैसर्गिक आणि एक आरोग्यदायी उपाय म्हणून तयार केलेली आहे. “हिना ब्रॅण्ड भारतातील पारंपारिक सौंदर्य पद्धतीचा एक अविभाज्य घटक आहे आणि आम्ही एक पूर्णपणे नैसर्गिक आणि सुरक्षित उत्पादन म्हणून बजाजची १०० टक्के शुद्ध मेंदी सादर करताना खूपच आनंदित आहोत.

जयदीप नंदी पुढे म्हणाले की, “बजाज ब्रँड हे नाव अनेक दशकांपासून लाखो भारतीयांच्या विश्वासाचे प्रतीक आहे. हे उत्पादन आमच्या ग्राहकांना नाविन्यपूर्ण परंतु नैसर्गिक आणि सुरक्षित अशी उत्पादने प्रदान करण्याच्या आमच्या वचनबद्धतेचा परिपाक आहे. बजाजच्या १०० टक्के शुद्ध मेंदीसह नैसर्गिक आविष्काराचा, चांगुलपणाचा अनुभव घ्या आणि तुम्हालाही तो नक्कीच आवडेल. बजाज १०० टक्के शुध्द हिना खालील प्रकारांमध्ये देशातील सर्व आघाडीच्या स्टोअर्समध्ये उपलब्ध असेल:
२५ ग्रॅमचे पॅकेट: किंमत रु. १०, ७५ ग्रॅम पॅकेट: किंमत रु. ३५ आधुनिक ट्रेड ई-कॉमर्स चॅनेलसाठी खास पॅकेट्स लवकरच बाजारात आणले जाणार आहेत. आधुनिक व्यापार पध्दतीमध्ये हायपर मार्केट, सुपरमार्केट चेन आणि मिनीमार्केट या प्रकारांचा समावेश होतो.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!