कल्याण : भर रस्त्यात एसटी चालक आणि खासगी वाहन चालकांमधील वाद आपल्याला नेहमीच अनुभवाला येतो पण कल्याणच्या शिवाजी चौकात भर रस्त्यात एसटी चालक आणि वाहतूक पोलीस भिडल्याचा प्रकार घडला. त्यामुळे वाहतूक कोंडीत अधिकच भर पडली होती.

कल्याण पश्चिमेकडील छत्रपती शिवाजी चौकात आज दुपारच्या सुमारास मोठ्या प्रमाणात वाहतुक कोंडी झाली होती .वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी या ठिकाणी  वाहतूक पोलिस तैनात होते .याच सुमारास या चौकातून जाणाऱ्या भिवंडी कल्याण एसटीला वाहतूक पोलिसांनी थांबण्यास सांगितले. पुढील चौकात वाहतूक कोंडी असल्यानेच वाहतूक पोलिसांनी एसटी चालकाला याच ठिकाणी थांबण्यास सांगितले. मात्र याच कारणावरून वाहतूक पोलीस आणि एसटी चालक, महिला वाहक यांच्यात वाद सुरू झाला हा वाद जवळपास १५ ते २० मिनटं सुरू होता. भर रस्त्यात एसटी थांबल्याने वाहतुकीचा मात्र खोळंबा झाला होता. अखेर काही कालावधीने हा वाद मिटल्याने एसटी मार्गस्थ झाली व वाहतूक सुरळीत झाली

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *