कल्याण  :​ ​ ​कल्याण रेल्वे स्थानकात प्रवासी असुरक्षित असल्याच्या घटना वारंवार घडत आहेत. रात्री ११ वाजता  लोकलची वाट पाहत फलाटावर उभ्या असलेल्या प्रवाशाला थेट तलवारीचा धाक दाखवत लुटण्याचा प्रयत्न​ केला मात्र प्रवाशाने आरडा ओरड केल्याने फलाटावर तैनात असलेल्या रेल्वे पोलिसांनी घटना स्थळी धाव घेत​ त्याला​ अटक केली.​ ​निखिल वैरागर असे या चोरट्याच नाव​ आहे. काही दिवसांपूर्वी दोन तरूणांना चाकूचा धाक दाखवून लुटण्याचा प्रकार घडला होता. त्यामुळे वारंवार घडणाऱ्या अशा घटनामुळे प्रवाशाच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे 

आंबिवली येथे राहणारा तरुण हा​ २९ऑगस्ट रोजी ​११ वाजण्याच्या सुमारास कल्याण रेल्वे स्थानकावर  ​२ नंबर फलाटावर पुलाच्या खाली लोकलची वाट पाहत उभा होता.​ याचवेळी  निखिल वैरागर ​हा​ ​२१ वर्षीय​ तरूण त्याच्या जवळ आला त्याने आपल्या शर्टाच्या आत लपवून ठेवलेली तलवार काढत या तलवारीचा धाक दाखवत जवळ असलेले पैसे आणि मोबाईल दे नाहीतर ठार मारण्याची धमकी दिली.मात्र  सुदैवाने लोकलच्या प्रतीक्षेत असलेला आणखी एक प्रवासी तलवार बघून पुढे सरसावला​ त्याने आरडा ओरड केल्याने  ड्युटीवर असलेल्या पोलिसांच लक्ष गेलं त्यांनी तत्काळ घटना स्थळी​ धाव ​ घेत निखील याला ताब्यात घेतलं​. रात्रीच्या वेळेस चोरटे दबा तिकिट कार्यालय परिसर अथवा फलाटावर दबा धरून बसतात व एकटया प्रवाशाला गाठून धमकावत असल्याचे प्रकार घडत आहेत त्यामुळे  रात्रीच्यावेळी पोलीसांनी बंदोस्त व  गस्त वाढविण्याची मागणी प्रवाशांकडून केली जात आहे. ​

https://www.citizenjournalist4.com/mobile-looted-for-fear-of-knife-in-kalyan-rly-station-8959/

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *