कल्याण;- लसींचा तुटवडा… मोठया रांगा… लसींसाठी शाब्दिक चकमकी… आणि गोंधळ असे चित्र प्रत्येक लसीकरण केंद्रावर नेहमीच दिसून येते पण आता तर लसीकरणावरून केंद्रावरच हाणामारीचा प्रकार कल्याणात समोर आला आहे लसीकरण केंद्रावरच दोन तरूणीमध्ये फ्री स्टाईल हाणामारी झाल्याची घटना कल्याणात घडली. त्यामुळे आता लसीकरण केंद्रावरही पोलीस बंदोबस्त ठेवावा लागणार का ? असाच प्रश्न उपस्थित होत आहे
कल्याण पश्चिमेकडील होली क्रॉस शाळेत लसीकरण सुरू होते. या दोन्ही तरूणी लस घेण्यासाठी केंद्रावर आल्या होत्या दोघीही रांगेत उभ्या होत्या. मात्र टाेकन नंबरवरून दोघींमध्ये शाब्दिक वाद झाला आणि वादाचे पर्यावसान हाणामारीत झाले. अखेर लसीकरण केेंद्रावरील कर्मचा-यांनी दोघींमधील भांडण मिटवलं. मात्र लसीकरण केंद्रावर ही हाणामारी सुरू असतानाच अनेकांनी आपल्या मोबाईल कॅमे-यातून ही हाणामारी टिपली आणि सोशल मिडीयावर व्हायरल केला. त्यामुळे केडीएमसी केंद्रावरील लसीकरण चर्चेचा विषय ठरला आहे.