कल्याण, दि. 24 ऑगस्ट :  शिवसैनिकाकडून भाजप कार्यालयावर दगडफेक, तोडफोडच्या घटना घडत असतानाच, कल्याणात शिवसैनिकाने भाजप पदाधिकार्याला मारहाण केल्याची घटना घडलीय. मारहाणीचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झालाय. त्यामुळे राणेंच्या आक्षेपार्ह वक्तव्यानंतर शिवसेना- भाजपमधील संघर्ष अधिकच तीव्र होताना दिसत आहे.

केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या वादग्रस्त वक्तव्याचे तीव्र पडसाद कल्याण डोंबिवलीत उमटलेले पाहायला मिळाले. कल्याणच्या देवी अहिल्याबाई होळकर चौकात असणाऱ्या भाजप कार्यालयावर शिवसैनिकांनी जोरदार दगडफेक करत या कार्यालयाच्या काचा फोडल्या. तसेच यावेळी दगडफेकीला विरोध करणाऱ्या भाजप पदाधिकाऱ्यालाही शिवसैनिकांनी  मारहाण केल्याचा प्रकार घडलाय.  कल्याण पश्चिमेचे आमदार विश्वनाथ भोईर आणि शिवसेनेचे महानगरप्रमूख विजय साळवी यांच्यासह शिवसेनेचे विविध कार्यकर्ते उपस्थित होते.दरम्यान या घटनेची माहिती मिळताच भाजप पदाधिकारी कार्यालयाबाहेर जमले असून पोलिसांचाही मोठा फौजफाटा तैनात करण्यात आला आहे. तसेच डोंबिवलीत इंदिरा चौकात शिवसेना व युवा सेनेच्या कार्यकर्त्यानी निदर्शने केली, कल्याण पूर्वेत शिवसानिकांनी नारायण राणे यांच्या प्रतिकात्मक पुतळ्यावर संताप व्यक्त केला.

त्या शिवसैनिकाचा सत्कार…

तर अटकेसाठी भाजपाचे आंदोलन…

कल्याणमधील भाजपा कार्यालय शिवसेनेकडून फोडण्यात आल्यानंतर छत्रपती शिवाजी महाराज चौकात भाजपने रस्त्यावर बसून अंदोलन करीत कार्यालय फोडणाऱ्या शिवसैनिकांना अटक करावी अशी घोषणा देत आंदोलन केले, तर दुसरीकडे भाजपा चे कार्यालय फोडणाऱ्या शिवसैनिकांनाचा शिवसेना पदाधिकाऱ्यांकडून सत्कार करण्यात आला. आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर, पोलिसांचा मोठा बंदोबस्त लावण्यात आला होता

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!