कल्याणच्या महात्मा फुले पोलिसांची कामगिरी

कल्याण : ओला,उबेर सारख्या वाहनाने प्रवास करणे सुरक्षित असल्याने नागरिक प्रवास करतात. मात्र वाहन चालक सुरक्षित नसल्याची घटना कल्याण मध्ये समोर आली आहे. बनावट प्रवाशाने उबेर चालकाची हत्या करून फरार झाल्याची धक्कादायक घटना उजेडात आली आले. मात्र कल्याणच्या महात्मा फुले पोलिसांनी या खुनाचा छडा लावून आरोपीना उत्तरप्रदेश येथून अटक केली.  राहुलकुमार गौतम आणि धर्मेंद्रकुमार गौतम अशी  आरोपींची नावे असून त्यांनी  गुन्ह्याची कबुली दिली आहे. अमृत गावडे असे या मृत उबेर चालकाचे नाव असून तो नवी मुंबई मधील दिघा, ऐरोली मधील रहिवासी आहे. पोलिसांनी या प्रकरणी राहुलकुमार गौतम, धर्मेद्र्कुमार उर्फ वकील गौतम, विशालकुमार गौतम, करणकुमार गौतम, बचई गौतम, अमन गौतम या आरोपी विरोधात गुन्हा दाखल केला आहे. दरम्यान या घटनेने खळबळ माजली आहे.


सविस्तर घटना ..
१ ऑगस्ट २०२१ रोजी रात्री ११ वाजता  कल्याणहुन धुळे येथे जाण्यासाठी उबेर कंपनीच्या ऍपवरून इटीगा कार बुक करण्यात आली होती. कल्याणच्या शिवाजी चौकातून उबेर कारचे चालक अमन गावडे याच्या कार मधून आरोपींनी प्रवास सुरु केला, यानंतर प्रवासी बनून आलेल्या त्या दोघांनी पडघा ते कसारा दरम्यान चालकाचे अपहरण करून आरोपींनी त्यांच्याकडील धारदार हत्याराने चालकाची हत्या करून त्याचा मृतदेह कसारा घाटात फेकून दिला व त्यानंतर  कार घेऊन पोबारा केला याप्रकरणी गाडी मालकाने गाडीसह चालक हरविल्याची तक्रार कल्याणच्या महात्मा फुले पोलीस ठाण्यात दाखल केली होती. सुदैवाने गाडी मालकाने गाडीला फास्ट टॅग केलेले असल्यामुळे गाडीने टोलनाका पार करताच त्याचा मेसेज मालकाच्या मोबाईलवर जात होता गाडीने थेट उत्तरप्रदेश गाठल्याचे मालकाला मेसेज आला. मालकाने याची माहिती पोलिसाना दिल्यानंतर पोलिसांच्या तपासाची चक्रे फिरली यानंतर पोलिसांनी प्रत्येक टोलनाक्यावरील सीसीटीव्ही तपासीत आरोपीचे चेहरे हेरले त्यानंतर उत्तर प्रदेश मधील भदोही येथे गाडीसह पळून गेलेल्या आरोपीपैकी राहुलकुमार गौतम आणि धर्मेंद्रकुमार गौतम या दोन आरोपींना गाडीसह ताब्यात घेतले. या आरोपींनी गुन्ह्याची कबुली दिली असून उर्वरित आरोपीचा शोध सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले .

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!