डोंबिवली : डोंबिवलीकरांच्या समस्या तातडीने सोडविण्यात याव्यात यासाठी काँग्रेस कामाला लागल्याची दिसून येत आहे. बुधवारी कॉंग्रेस कार्यकर्त्यानी प्रदेश सचिव संतोष केणे यांच्या नेतृत्वाखाली शिधावाटप कार्यालय आणि वीज वितरण कंपनी च्या कार्यालयाला भेट देऊन निवेदन सादर केले.
सध्याची कोरोनाची परिस्थिती आणि वाढत्या महागाईमुळे सर्वसामान्य नागरिक मृटाकुटीला आला आहे. राज्य सत्कारकडून गोरगरिबांना मोफत व माफक दरात शिधा पुरविण्याचे आदेध दिले आहेत त्यानुसारच शहरातील गोरगरीब लाभार्ती जनतेला शिधावाटप दुकानातून शिधा वेळेवर मिळावा यासाठी काँग्रेस च्या शिष्टमंडळाने शिधावाटप अधिकाऱ्यांची भेट घेऊन निवेदन दिले. तसेच वारंवार खंडित होणारा वीज पुरवठा, अव्वाच्या सव्वा आकारण्यात येणारी वीज बिल याविद्युत समस्यांबाबत शिष्टमंडळासह भेट घेऊन निवेदन देण्यात आले. या प्रसंगी एकनाथ म्हात्रे, अजय पोळकर, वर्षाताई गुज्जर-जगताप, शरद भोईर, पमेश म्हात्रे, अभय तावरे, राहुल केणे उपस्थित होते.
—-