कल्याण : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा आज वाढदिवस..पूरपरिस्थिती, कोरोनाचे संकट यामुळे वाढदिवस साजरा करू नये असे आवाहन खुद्द ठाकरे यांनी शिवसैनिकांना केले होते. मात्र भाजपचे आमदार गणपत गायकवाड यांनी मुख्यमंत्र्यांच्या वाढदिवसा निमित्त सद्भावना यज्ञ केला. खराब रस्ते तातडीने दुरुस्त व्हावेत यासाठी यज्ञाच्य माध्यमातून अनोखे आंदोलन करण्यात आलं.
कल्याण डोंबिवली महानगरपालिका क्षेत्रात असलेल्या आशेळी गावातील मुख्य रस्त्याची गेल्या पाच वर्षापासून दुरावस्था आहे . या रस्त्याच्या डागडुजी संदर्भात भाजपा आमदार गणपत गायकवाड यांनी सातत्याने शासनाकडे पाठपुरावा केला मात्र अद्यापही रस्त्याची डागडुजी केली जात नसल्याने गेल्या पाच वर्षांपासून नागरिक खड्डेमय रस्त्यातून प्रवास करत आहेत याच्या निषेधार्थ आमदार गणपत गायकवाड यांनी आज या खड्डेमय रस्ता तसेच मुख्यमंत्री यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून होम हवन करत उपरोधीक आंदोलन केलं .यावेळी आमदार गायकवाड यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे पालकमंत्री एकनाथ शिंदे खासदार श्रीकांत शिंदे याचा भूमिकेचा निषेध नोंदवला . शिवसेनेच्या नेत्यांकडून जाणुन बुजून आमची काम अडवली जात असल्याचा आरोप यावेळी आमदारांनी केला