डोंबिवली : मोबाईल टॉवर्सच्या मशिन्स लांबविणाऱ्या तिघा सराईत चोरट्यांना अटक करण्यात आली आहे. ही कारवाई क्राईम ब्रँचने केली आहे. या त्रिकुटाकडून आतापर्यंत ३ गुन्हे उघडकीस आले आहेत. कैलास शिवाजी सांवत (३८), अकबर युसूफ शेख (३२) आणि संजय रमेश सौदे (४५) अशी अटक करण्यात आलेल्या चोरट्यांची नावे असून हे तिघेही उल्हासनगरमध्ये राहणारे आहेत.
मोबाईल टॉवर्सच्या महागड्या मशिन्सच्या चोऱ्या होत असल्याने पोलिस ठाण्यांतून तक्रारी वाढत चालल्या होत्या. या चोरट्यांचा छडा लावण्यासाठी वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजू जॉन यांच्या मार्गदर्शनाखाली सपोनि भूषण दायमा, फौजदार नितीन मुदगुन, मोहन कळमकर, दत्ताराम भोसले, राजेंद्र घोलप, राजेंद्र खिलारे, अजित राजपूत, मंगेश शिर्के, सचिन साळवी, गुरुनाथ जरग, सचिन वानखडे, प्रकाश पाटील, हरिश्चंद्र बंगारा या टीमने चोरांना अटक केली. या त्रिकुटाकडून स्लायसिंग मशिन, ओटीडीआर मशिन, लेझर लाईट पॉवर मिटर, अशा विविध कंपन्यांच्या महागड्या मशिन चोरल्याची कबुली दिली. या त्रिकुटाच्या विरोधात टिटवाळ्याच्या कल्याण तालुका, अंबरनाथमधील शिवाजीनगर आणि उल्हासनगरमधील हिललाईन अशा तिन्ही पोलिस ठाण्यांतून गुन्हे दाखल आहेत. या त्रिकुटाकडून आणखी गुन्ह्यांची उकल होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. या चोरट्यांना कल्याण तालुका पोलिसांकडे देण्यात आले आहे. ( सिटीझन न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला Facebook, Instagram, Twitter, Likdin आणि YouTube वर नक्की फॉलो करा )