डोंबिवली – डोंबिवली येथील इंदिरा नगर वस्तीतील नागरिक मोबाईल तंत्राच्या अभावामुळे लसीकरणापासून मोठ्या संख्येने वंचित आहेत.करोनाचा संसर्ग होउ नये यासाठी नागरिकांचे लसीकरण मोठ्या संख्येने होणे गरजेचे आहे. यासाठी रिपाईच्या(आठवले) डोंबिवली शहर शाखेच्या वतीने इंदिरा नगर येथील नागरिकांची लसीकरणासाठी नाव नोंदणी करण्यात येणार आहे. अशी माहिती रिपब्लिकन पार्टी आँफ इंडियाचे डोंबिवली शहर अध्यक्ष अंकुश गायकवाड यांनी दिली आहे.

स्वच्छतेची कोणत्याही सोयीसुविधा नसताना करोना संसर्ग इंदिरा नगर मध्ये जाणवलेला नाही.परंतु येथे घरकाम करणारे, गवंडी, सुतार, प्लंबर, वायरमन, रिक्षाचालक, फेरिवाले, कचरावेचक इत्यादी कष्टकरी समाज मोठ्या संख्येने राहत आहेत. कामानिमित्त ते बाहेर पडत असल्याने बाहेरुन संसर्गाचा प्रसार वस्तीत होउ शकतो.त्याचप्रमाणे येथील नागरिकांना करोनाची बाधा होउ नये, त्यासाठी लसीकरण होणे गरजेचे आहे. सरकारने लसीकरणाच्या नोंदणीसाठी आँनलाईन सोय केली असली तरी त्यासाठी अँनड्राईड मोबाईल असणे आवश्यक आहे. येथील अनेक नागरिकांकडे अश्या प्रकारचे मोबाईल नाहीत. तर अनेकांकडे मोबाईल असून नोंदणी करण्याचे मोबाईल मधील तंत्र अवगत नसल्याने येथील नागरिकांचे मोठ्या संख्येने अद्याप लसीकरण झालेले नाही. अशी माहिती रिपाईच्या कार्यकर्त्यांनी दिली आहे. रिपाईच्या वतीने इंदिरा नगर येथे पक्ष कार्यालय सुरु आहे. या कार्यालयात १मे पासून लसीकरण नोंदणी सुरु करण्यात आली आहे. दररोज सायंकाळी हि नोंदणी सुरु असत लस कुप्यांचा पुरेसा पुरवठा शासनाच्या वतीने होत नसल्याने कल्याण डोंबिवली शहरातील लसीकरण केंद्रे बंद आहेत.परंतु हि लस केंद्र पुर्ववत होताच, नोंदणीकृत लाभार्थ्यांना मोबाईल लघुसंदेशाद्वारे (मेसेज) लस केंद्र कळविले जाईल अशी माहिती रिपाईच्या वतीने देण्यात आली आहे. संपर्क –
रिपाई वार्ड अध्यक्ष तेजस जोंधळे – ९९८७९७२४१४.
धम्मपाल सरकटे – ८६५२७२६८८४.९९२०९४६३७९.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!