कल्याण : प्रॉपर्टीच्या वादातून नातवाने आजोबांची हत्या केल्याची घटना रविवारी सकाळी कल्याणच्या ठाणगे परिसरात घडली.या प्रकरणी हर्षल ठाणगे याला महात्मा फुले चौक पोलिसांनी अटक केली आहे.तर नारायण ठाणगे (55) असे मयत झालेल्या व्यक्तीचे नाव आहे.
कल्याणच्या ठाणगे परिसरात राहणारे नारणाय ठाणगे ,सुभाष ठाणगे आणि कुंडलिक ठाणगे यांच्या प्रॉपर्टीच्या वादातून वाद सुरू आहे.मात्र नारायण आणि कुंडलिक यांच्यात त्यांनी एक प्रॉपर्टी 2012 साली डेव्हलप करण्यासाठी विकासकास दिली होती. तेव्हा विकासकाने दिलेल्या एका गाळ्यावरून नारायण आणि कुंडलिक यांच्यात वाद सुरू आहे. हा वाद अखेर कल्याण दिवणी न्यायालयात गेला असून त्याबाबतचा खटला न्यायालयात सद्या सुरू आहे. असे असतानाही सकाळी 7 च्या सुमारास वाद घातला. तसेच त्यावादाचे रुपांतर हाणामारीत होऊन चिढलेल्या हर्षलने आजोबा नारायण ठाणगे आणि काका दिनेश यांच्यावर धारदार शस्त्राने हल्ला केला.यात आजोबा नारायण याचा मृत्यू झाला तर त्यांचा मुलगा दिनेश हा जखमी झाला. या प्रकरणी दिनेश ठाणगे याच्या फिर्यादी वरून महात्मा फुले चौक पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी आरोपी हर्षल ठाणगे याला तात्काळ बेड्या ठोक्याला आहेत .***