कल्याण/ प्रतिनिधी..कल्याण पश्चिम मिलिंद नगर परिसरात राहणाऱ्या सुजित पाटील या तरुणाची तीन दिवसांपूर्वी झालेल्या किरकोळ वादातून कोयत्याने वार करून हत्या करण्यात आली .या प्रकरणी खडकपाडा पोलिसांनी किरण भरम या आरोपीला ताब्यात घेत पुढील तपास सुरू केला आहे .

बाईट… अनिल पोवार सहाय्यक पोलीस आयुक्त कल्याण

सुजित पाटील आणि किरण भरम हे दोघे याच परिसरात राहत होते . तीन दिवसांपूर्वी त्यांच्यात काही कारणवरून वाद झाला होता याच वादातून शुक्रवारी सायंकाळी किरण भरम याने आपल्या साथीदारासह सुजित पाटील याला घराच्या परिसरात गाठत कोयत्याने वार करत निर्घृण हत्या केल्याची माहिती पोलिसांनी दिली.पोलिसांनी घटना स्थळी धाव घेतली, आरोपी किरम भरम याला ताब्यात घेत पुढील तपास सुरू केला आहे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *