डोंबिवली : डोंबिवली एमआयडीसी मिलापनगर तलाव समोरील देवेंद्र बंगल्यातील टील्ट पार्किंग मध्ये इन्व्हर्टरला कनेक्शन करून चालू स्थितीत ठेवलेल्या 6 बॅटऱ्या दि. 21/09/2020 रोजी पहाटे साडेचार दरम्यात चोरीस गेल्याची घटना घडली आहे. सदर रिक्षा व मोटारसायकलने आलेले एकूण 5 चोरटे सिसी कॅमेरात कैद झाले असून मानपाडा पोलीस ठाण्यात याबद्दल रू. 42000/- किंमतीचा ऐवज चोरीस गेल्याचे FIR नोंदवण्यात आली आहे. प्रत्येक बॅटरीचे प्रत्येकी वजन 70 किलो होते. चोरटयांनी कनेक्शन केलेल्या वायरी अलग केल्या त्यावरून चोरटे त्यातील तरबेज असावेत. त्यानंतर त्या बॅटऱ्या ते रिक्षातून घेऊन गेले असल्याचे पाहण्यास आले आहे. यापूर्वीही लॉकडाऊन काळात निवासी भागात चोरीचा अनेक घटना घडल्या आहेत त्यात काही चोरटे सीसी कॅमेरात कैद झाले होते.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!