डोंबिवली / प्रतिनिधी : डोंबिवली मध्ये सुरू असलेल्या कोवीड रुग्णालयाच काम अत्यंत संथ गतीने सुरू आहे. महापालिकेचे काम कासवगतीने सुरू आहे. एका महिन्यापासून पीएम केअर मधून आलेले व्हेंटिलेटर धूळ खात पडलेले आहेत. तर महापालिकेडून तारीख पे तारीख दिली जात आहे.त्यामुळे मनसे आमदार राजू पाटील यांनी महापालिकेच्या कारभारावर जोरदार टीका केली.

एकीकडे कोरोनाचा रूग्णांची संख्या कमी होत आहे तर दुसरीकडे मा खाटांची संख्या वाढत आहे. कोरोनाची इथून जाण्याची मानसिकता आहे पण इथल्या राजकारण्यांची कोरोना पळवण्याची मानसिकता आहे का ? असा सवाल आमदार राजू पाटील यांनी उपस्थित केला असून, कल्याण डोंबिवलीतील सावळागोंधळावर टीका करीत नाराजी व्यक्त केली आहे.

*****

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!