कल्याण / प्रतिनिधी : कल्याणातील मटका किंग जिग्नेश उर्फ मुन्या ठक्कर याची शुक्रवारी गोळ्या झाडून हत्या करण्यात आली. खंडणीच्या पैशांसाठी गँगस्टर धर्मेश उर्फ नन्नू शहा याने आपला मित्र जीग्नेश उर्फ मुन्या ठक्कर याची गोळ्या झाडून हत्या केली असून, गँगस्टर नन्नू शहा व त्याच्या साथीदाराचा शोध सुरू केला आहे अशी माहिती कल्याण पोलीस परिमंडळ 3 चे डिसिपी डॉ विवेक पानसरे यांनी दिली. या घटनेमुळे कल्याणात गँगवॉरने पुन्हा एकदा डोके वर काढल्याचे दिसून येत आहे.
कल्याणच्या स्टेशन समोरील निलम गल्लीत जिग्नेशचे कार्यालय आहे. रात्री साडेनऊच्या सुमारास कार्यालयात बसला असतानाच जिगेशचा बालपणीचा मित्र गॅगस्टार नन्नू शहा हा त्याच्या साथीदारांसह तेथे आला. त्यानी जिग्नेशवर पाच गोळ्या फय्यर करून तेथून फरार झाले. या घटनेची माहिती मिळताच महात्मा फुले पोलीस घटनास्थळी दाखल झाले. जिग्नेशला फॉरटीज रुग्णालयात दाखल करण्यात आले. डॉक्टरानी त्यांना मृत घोषित केले. धर्मेश उर्फ नन्नू शहा व जिग्नेश उर्फ मुन्या ठक्कर हे दोघे मित्र होते .दोघांच्या विरोधात अनेक गुन्हे दाखल आहेत. खंडणीच्या पैशावरुन दोघांमध्ये वाद झाला होता. त्यातून ही हत्या झाल्याचा पोलिसांनी सांगितले. पोलीस फरार ननु शहा आणि त्यांच्या साथीदाराच्या शोध घेत आहेत. *****