मुंबई/ प्रतिनिधी : गेल्या ५० वर्षांहून अधिक काळ ग्राहकांच्या सेवेत असलेले एच. पी. गॅस सिलिंडरचे अधिकृत वितरक मेसर्स पी. ए. झवेरी कंपनीतर्फे कोरोनाचा संसर्ग टाळण्यासाठी ‘करो डिजिटल, रहो बेफिकर’! चा नारा दिला आहे. कोरोनासारख्या महामारीत ग्राहक आणि वितरकांची सुरक्षा लक्षात घेऊन कॅशलेस मोहीम हाती घेतली आहे. या मोहिमे अंतर्गत व्हाट्सऍप बुक टू ९२२२२०११२ या क्रमांकावर घरपोच एच. पी. गॅस सिलिंडरची नोंदणी करता येणार आहे. ‘नोंदणी करणे सोपे आणि पैसे अदा करणेही सोपे’, हा मंत्र या मोहिमे अंतर्गत देण्यात आला आहे. आमच्या चेंबूर, गोवंडी, मानखुर्द, ट्रॉम्बे येथील ग्राहकांनी या मोहिमेचा अधिका अधिक लाभ घ्यावा, असे आवाहन वितरक M/S P A Zaveri GAS Agency चेंबूर यांच्यातर्फे करण्यात आले आहे.