ठाणे आणि केडीएमसीला अमेरिकेची अद्यावत प्रत्येकी १० व्हेंटिलेटर विनामूल्य उपलब्ध 

 खासदार डॉ श्रीकांत शिंदे यांचा पुढाकार 

ठाणे/ प्रतिनिधी – ठाणे आणि कल्याण-डोंबिवली महानगरपालिका क्षेत्रात कोरोनाच्या रुग्णांची वाढती संख्या लक्षात  कृष्णा डायगोनोस्टिकस आणि खा डॉ श्रीकांत फौंडेशनच्या संयुक्त विद्यमाने दोन्ही महापालिका रुग्णालयांना २०  व्हेंटिलेटर प्रदान करण्यात आले. अमेरिकेच्या पलमोनेटिकस कंपनीने अद्ययावत तंत्रज्ञानाने केलेल्या या व्हेंटिलेटरच्या माध्यमातून रुग्णाला एका रुग्णालयातून दुसऱ्या रुग्णालयात नेता येऊ शकणार आहे. त्यामुळे व्हेंटिलेटरवर असलेल्या अतिगंभीर रुग्णांना पुढील उपचारासाठी आता मुंबईत हलविता येणे शकय होणार आहे.

ठाणे महानगरपालिकेत महापौर नरेश म्हस्के, स्थायी समिती सभापती राम रेपळे आणि कृष्णा डायगोनिस्टकचे संचालक राजेंद्र मुथा यांच्या उपस्थितीत महापालिका आयुक्त विजय सिंघल यांच्याकडे १०  व्हेंटिलेटर सुपूर्द करण्यात आले. तर कल्याण डोंबिवली महानगरपालिकेत  आयुक्त डॉ विजय सूर्यवंशी यांच्याकडे १० व्हेंटिलेटर सुपूर्द करण्यात आले. दरम्यान, दोन्ही आयुक्तांच्या समवेत खा डॉ श्रीकांत शिंदे यांनी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर महापालिका क्षेत्रातील रुग्णालयांच्या समस्या आणि उपाययोजना यावर सविस्तर चर्चा केली आणि आवश्यक सूचना केल्या. महापालिका रुग्णालये अधिक सक्षमपणे कार्यान्वित करण्यासाठी आपण खासदार निधीतून यापूर्वी ५०  लाख रुपयांचा निधी दिला आहे. सध्या खासदार निधी रद्द झाल्याने यापुढे खासदार निधी देता येणे शक्य नसले तर सीएसआर  निधीतून आणि वेळप्रसंगी वैयक्तिक मदत करण्याचा शब्द यावेळी खासदार डॉ श्रीकांत शिंदे यांनी दिला.

—————

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!