जय मल्हार शालेय विद्यार्थी वाहक सामाजिक संस्थेचा पाचवा वर्धापनदिन : 

डोंबिवली : जय मल्हार शालेय विद्यार्थी वाहक सामाजिक संस्थेच्या पाचव्या वर्धापनदिनाचे औचित्य साधून रविवारी १२ जानेवारी २०२०  रोजी श्री सत्यनारायणची पूजा आणि अंतर्गत रस्ता सुरक्षा अभियान निमित्त भव्य मॅरेथॉन स्पर्धाचे आयोजन करण्यात आले आहे. सकाळी 7 वाजता एमआयडीसी निवासी विभागातील महावितरण कार्यालयासमोरून या मॅरेथॉनला मान्यवरांच्या हस्ते हिरवा झेंडा दाखविण्यात येणार असल्याचे संस्थेचे अध्यक्ष सुदाम जाधव यांनी सांगितले.

या मॅरेथॉनमध्ये जवळपास बाराशे विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला आहे. यामध्ये काही मतिमंद विद्यार्थ्यांचाही समावेश राहणार आहे. शिवसेना कल्याण जिल्हाप्रमुख गोपाळ लांडगे यांच्यासह खासदार डॉ. श्रीकांत शिंदे, आ. रवींद्र चव्हाण, आ. प्रमोद तथा राजू पाटील ज्येष्ठ नगरसेवक रमेश म्हात्रे, भाऊसाहेब चौधरी, शहरप्रमुख राजेश मोरे, महाराष्ट्र राज्य विद्यार्थी महासंघाचे अध्यक्ष सदाशिव हुमणे कल्याण उपप्रादेशिक परिवहन अधिकारी संजय ससाणे आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!