मनपा, नगरपरिषद, नगरपंचायती मधील अधिकारी व कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोग लागु
कर्मचारी संघटनांनी अर्थमंत्री मुनगंटीवार यांचे मानले आभार
मुंबई (अजय निक्ते) : राज्यातील महानगरपालिका, नगरपालिका, नगर पंचायती मधील अधिकारी व कर्मचा-यांना सातवा वेतन आयोग लागु करण्याचा निर्णय मंगळवारी झालेल्या मंत्रीमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला. या निर्णयाबद्दल आज भारतीय मजदुर संघाचे प्रदेशाध्यक्ष रामगोपाल मिश्रा व म्युनिसीपल एम्प्लॉईज युनियनचे कार्याध्यक्ष संतोष पवार यांनी अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांची भेट घेत त्यांचा सत्कार केला व आभार व्यक्त केले.
या निर्णयाचा लाभ राज्यातील ३६२ नगर परिषदा व नगर पंचायती तसेच २६ महानगरपालिकेतील अधिकारी व कर्मचा-यांना तसेच निवृत्ती वेतन धारकांना होणार आहे. अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या पुढाकाराने घेण्यात आलेल्या या निर्णयामुळे अधिकारी व कर्मचा-यांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.
———————————————-