९९ वर्षाच्या आजी आणि नातीने बजावला मतदानाचा हक्क
डोंबिवली (प्रतिनिधी) : डोंबिवली पश्चिमेत राहणाऱ्या द्रौपदाबाई सखाराम म्हात्रे या ९९ वर्षाच्या आजीने नाती पूर्वीता गोरखनाथ म्हात्रे हिच्यासह मतदानाचा हक्क बजावला. विशेष म्हणजे पूर्वीता हि नवमतदार असून तिने आजीबरोबर पहिल्यांदाच मतदान केलं. आजी आणि नातीचा हा प्रसंग डोंबिवलीत पहावयास मिळाला. यावेळी वडील गोरखनाथ म्हात्रे आणि आई कविता म्हात्रे , काका मुकुंद म्हात्रे अश्या म्हात्रे कुटूंबियांने सहकुटूंब मतदानाचा हक्क बजावला. पालिकेच्या ह प्रभाग क्षेत्र कार्यालयात त्यांनी मतदानाचा हक्क बजावला..
- ————-