विधिमंडळाचे अर्थसंकल्पीय अधिवेशन २५ फेब्रुवारीपासून
मुंबई, : महाराष्ट्र विधिमंडळाचे सन 2019 चे पहिले (अर्थसंकल्पीय) अधिवेशन येत्या 25 फेब्रुवारीपासून सुरु होणार आहे. मंगळवारी विधानसभा व विधानपरिषदेची कामकाज सल्लागार समितीची बैठक पार पडली त्यात विधिमंडळाच्या कामकाजाबाबत चर्चा करण्यात आली.
अधिवेशनाचे कामकाज दि. 2 मार्च 2019 पर्यंत चालणार आहे. सन 2019-2020 चा अंतरिम अर्थसंकल्प बुधवार दि. 27 फेब्रुवारी रोजी सादर होणार आहे. शनिवार दि. 2 मार्च रोजी दुष्काळावर चर्चा करण्यासाठी या दिवशी कामकाज सुरु राहणार आहे. या अधिवेशन काळामध्ये विधानसभेत प्रलंबित असलेली सहा विधेयके , तर विधानपरिषदेचे एक प्रलंबित विधेयक मांडण्यात येणार आहे. विधानसभा कामकाज सल्लागार समितीची बैठक अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांच्या अध्यक्षतेखाली झाली. तर विधानपरिषदेच्या कामकाज सल्लागार समितीची बैठक सभापती रामराजे नाईक-निंबाळकर यांच्या उपस्थितीत पार पडली.
**