डोंबिवली पत्रकार संघाची नवीन कार्यकारिणी : 

अध्यक्षपदी  विकास काटदरे तर सचिवपदी श्रीराम कांदू यांची निवड  !

 डोंबिवली : डोंबिवली शहरातील प्रतिष्ठीत समजला जाणारा  डोंबिवली पत्रकार संघाची २०१९-२० ची नवीन कार्यकारिणी सोमवारी घोषीत करण्यात आली. डोंबिवली पत्रकार संघाच्या अध्यक्षपदी ज्येष्ठ पत्रकार विकास काटदरे (सामना), कार्याध्यक्षपदी राजलक्ष्मी पुजारे-जोशी( महाराष्ट्र टाईम्स), सचिवपदी श्रीराम कांदू ( वृत्तमानस ) आणि खजिनदारपदी प्रवीण गोरे ( लव-अंकुश साप्ताहिक –संपादक ) याची बिनविरोध निवड करण्यात आली. संघाच्या मावळत्या अध्यक्षा जान्हवी मोर्ये यांनी अध्यक्षपदाची धुरा नवनियुक्त अध्यक्ष जेष्ठ पत्रकार काटदरे यांच्या हाती सोपविली.

डोंबिवली पत्रकार संघाची वार्षिक बैठक मॉर्डन प्राईड हॉटेलमध्ये पार पडली. यावेळी जुन्या कार्यकारिणीने मागील वर्षाच्या कामांचा लेखाजेाखा मांडला तसेच  संघाच्यावतीने आयोजित केलेल्या  वार्तालापासंबधी माहिती देण्यात आली. त्यानंतर नवीन कार्यकारिणीची निवड करण्यात आली. संघाचे नवनिर्वाचित अध्यक्ष  विकास काटदरे  त्यांनी  सांगितले की,  प्रत्येक क्षेत्रातील माहिती पत्रकार संघाच्या माध्यमातून वाचकांपर्यंत पोहचविण्यासाठी त्या क्षेत्रातील तज्ञ अथवा मान्यवरांचे  वार्तालापाचे आयोजन केले जाते. डोंबिवली शहरात अनेक सेवाभावी संस्था, संघटना सामाजिक काम करीत आहेत. तसेच प्रशासकीय पातळीवर अनेक निर्णय होत असतात. निवडणुकींचा काळ असल्याने अनेक राजकीय घडामेाडी होत असतात. त्यामुळे सर्वच क्षेत्रातील तज्ञांचे  वार्तालापासंबधी कार्यक्रम आणि  विविध उपक्रम हाती घेण्याचा मानस त्यांनी व्यक्त केला. नव्या कार्यकारिणीस शहरातील सर्वच क्षेत्रातील मान्यवर व पत्रकारांनी शुभेच्छा दिल्या.

 

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!