नो एंट्री मध्ये एंट्री करणा-यांना गुलाबाचे फुल देऊन निषेध

शिवनलिनीचा असाही उपक्रम 

डोंबिवली :- पुर्वेकडील विष्णु शास्री चिपळुणकर मार्ग (शिवाजी चौक) येथे रामनगरकडून शिवाजी पुतळा मार्गाकडे येण्यास वाहनांना प्रवेश बंदी असूनही कित्येक वाहनचालक बेकायदेशीरपणे व बेदरकारपणे या मार्गावरून प्रवास करतात. यामध्ये दुचाकीसह, चारचाकी व रिक्षा वाहनांचाही समावेश होतो.

बेकायदेशीर रित्या नो एंट्री मध्ये प्रवेश करणार्या वाहनचालकांचा रविवारी शिवनलिनी प्रतिष्ठानकडून गुलाब देत निषेध करण्यात आला व आपली सुरक्षा आपल्या हाती असा संदेश देण्यात आला. याबाबतचे निवेदन डोंबिवली वाहतुक विभागाला देण्यात आले.सदर उपक्रम प्रतिष्ठानचे महासंचालक  अनिरूद्ध कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली डोंबिवली शहर अध्यक्ष  दत्ता वाठोरे, महेश काळे, सागर भंडारी, समाधान पवार व इतर पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी केला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *