*पर्यावरणीय आकाश कंदील कार्यशाळेला डोंबिवलीकरांचा उस्फुर्त प्रतिसाद*

डोंबिवलीच्या टिळकनगर सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ आणि रोटरी क्लब डोंबिवली सिटी यांच्या संयुक्त विद्यमाने सलग सातव्या वर्षी पर्यावरणीय आकाशकंदील बनवण्याचे शिबिर रविवारी सर्वेश हाँल, डोंबिवली पार पडले. अशी माहिती प्रसिध्दी प्रमुख संदीप वैद्य यांनी दिली.

सदर शिबीरात दोन आकाश कंदील गद्रे बंधूंच्या . मयुरेश गद्रे यांच्या मार्गदर्शनाखाली शिकवण्यात आले. त्यासाठी लागणारे सर्व साहित्य आयोजक संस्थांनी दिले होते . या शिबिराचा लाभ ६० जणांनी घेतला त्यापैकी ४० पालकांनी आपल्या मुलांबरोबर कंदील बनवण्याचा आनंद घेतला. अनेक पालकांनी मोबाईल गेममध्ये अडकलेल्या मुलांसाठी हे वेगळाच आनंद देणारे शिबिर आयोजित केल्याबद्दल दोन्ही संस्थांचे‌ आभार मानले. सदर उपक्रमाला रोटरी क्लब डोंबिवली सिटी व टिळकनगर सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाचे कार्यकर्ते उपस्थित होते. या उपक्रमाची जबाबदारी गणेशोत्सव मंडळाच्या सोनाली पाठारे व प्राची शेंबेकर यांनी यशस्वीपणे सांभाळली. अशी माहिती प्रसिध्दी प्रमुख संदीप वैद्य यांनी दिली.

**

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *