अंधेरी रेल्वे स्टेशनजवळ पादचारी पुलाचा भाग कोसळल्यानं वाहतूक विस्कळीत, 2 जण जखमी

मुबई – अंधेरी स्टेशनजवळील गोखले  पादचारी पुलाचा काही भाग कोसळला आहे. रेल्वे ट्रॅकवरच  पुलाचा काही भाग कोसळल्यानं पश्चिम रेल्वेच्या वाहतुकीवर परिणाम झाला आहे. सकाळी साडेसातच्या  सुमारास हा प्रकार घडला.  टफॉर्म क्रमांक 8 आणि 9 वरील ही घटना आहे. यामध्ये दोन जण जखमी झाले आहेत. ऐन कार्यालय गाठण्याच्या वेळेस झालेल्या या खोळंब्यामुळे प्रवाशांना मनस्ताप सहन करावा लागत आहे. पुलामुळे ओव्हरहेड वायरही तुटलेल्या आहेत.  या घटनेमुळे चर्चगेटहून विरारकडे जाणारी व विरारहून चर्चगेटच्या दिशेनं येणार वाहतूक पूर्णतः ठप्प झाली आहे. सध्या कामाला जाणाऱ्या चाकरमान्यांची लगबग सुरू आहे. ऑफिससाठी बाहेर निघालेले चाकरमानी मात्र पश्चिम रेल्वे मार्गावर ताटकळलेत. या घटनेमुळे रस्ते मार्गावरही वाहतूक कोंडी दिसू लागलीय. पोलीस पर्याय मार्गाचा वापर करण्यासाठी नागरिकांना आवाहन करताना दिसत आहेत. या मार्गावरून प्रवास करणाऱ्या नागरिकांना आवाहन आहे. या ठिकाणी गर्दी करू नका. तुमच्याकडे इच्छित स्थळी पोहचण्यासाठी पर्यायी मार्ग असेल तरच घराबाहेर पडा असे आवाहन करण्यात आलय.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *