डोंबिवलीत ‘किचन क्राफ्ट कंपनी आगीच्या भक्षस्थानी :          सुदैवाने जीवितहानी नाही 

डोंबिवली : डोंबिवली औद्योगिक विभागातील आरती केमिकल कंपनीच्या बाजूला असलेल्या “किचन क्राफ्ट “कंपनीला आज सायंकाळी साडेपाच वाजण्याच्या सुमारास अचानक आग लागली यामुळे काम करणारे कर्मचारी घाबरून  कंपनीबाहेर पळाले. यात सुदैवाने जीवितहानी झाली नाही. मात्र सर्व साहित्य आगीत जळून खाक झाले. संपूर्ण परिसर धुराने व्यापला होता. किचन क्राफ्ट कंपनीत स्वयंपाकाचे साहित्य बनवण्यात येते जर्मनीतून येथे प्लायवूड आणून प्रक्रिया करून साहित्य बनवले जाते आग शॉर्ट सर्किटने लागली असल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.  या कंपनीच्या शेजारी आरती केमिकल कंपनी असून तिलाही आगीची झळ लागण्याची भीती असल्याने केमिकलचे बॅरल हलवण्यात आल्याने मोठा अनर्थ टळला.  आगीचे वृत्त समजताच अग्निशमन दलाच्या 4/5 गाड्या दाखल झाल्या संपूर्ण परिसर प्रचंड धुराने व्यापल्याने बुुघ्याची गर्दी  झाली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *