सुमित मल्लिक नवे मुख्य माहिती आयुक्त ! 
मुंबई :  राज्याच्या मुख्य सचिव पदावरून सेवानिवृत्त झालेले सुमित मल्लिक राज्यशासनाने मुख्य माहिती आयुक्तपदी वर्णी लागलीय.  मल्लिक यांनी आज  राज्य मुख्य माहिती आयुक्तपदाची  शपथ घेतली. लोकायुक्त म.अ.टहलियानी यांनी मल्लिक यांना पदाची शपथ दिली. त्यानंतर मल्लिक यांनी प्रभारी मुख्य माहिती आयुक्त ए. के. जैन यांच्याकडून सूत्रे स्विकारली.  मल्लिक हे राज्याच्या मुख्य सचिव पदावरून 30 एप्रिलला सेवानिवृत्त झालेत.  यावेळी मुख्य सचिव डी. के. जैन, वित्त विभागाचे अपर मुख्य सचिव यू.पी.एस. मदान, सामान्य प्रशासन विभागाचे प्रधानसचिव तथा मुख्य राजशिष्टाचार अधिकारी राजगोपाल देवरा, सामान्य प्रशासन विभागाचे प्रधान सचिव महेश झगडे,  वित्त विभागाचे प्रधान सचिव नितीन गद्रे यांच्यासह विविध विभागाचे माहिती आयुक्त यावेळी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!