डोंबिवली दरबार हॉटेलला भीषण आग

डोंबिवली (शंकर जाधव) :  पश्चिमेकडील स्टेशनजवळील महात्मा फुले रोडवरील डोंबिवली दरबार हॉटेलला गृरुवारी दुपारी पावणे तीनच्या सुमारास भीषण  आग लागल्याची घटना घडली. हॉटेलमधील गॅस सिलेंडरची गळती झाल्यानेच ही आग  लागलीय.  या आगीत हॉटेल जळून खाक झाले. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही. अग्निशामक दलाच्या जवानांनी काही मिनिटाच आग आटोक्यात आणली.

महात्मा फुले रोडवरील श्रम साफल्य बिल्डींगमध्ये  डोंबिवली दरबार नामक हॉटेल आहे. गुरुवारी हॉटेलला अचानक आग लागली आगीची धग बिल्डींगच्या दुसऱ्या मजल्यापर्यत गेल्याने इमारतीतील रहिवाशी घाबरून इमारतीखाली आले. अग्निशमक दलाला जवानांनी काही वेळातच आग विझवली. हॉटेलमधील गॅस सिलेंडर लिकेज झाल्याने आग लागल्याची माहिती हॉटेलमालक राजेंद्र पांडुरंग देशमुख यांनी दिली.  हॉटेलमधील तीन मोबाईलहि जळून खाक झाले.अग्निशामक दलाच्या जवानांना काही नागरिकांनी मदत केली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *