ठाणे जिल्हा नियोजन समिती निवडणूक १० मे ला  ;  जिल्ह्याच्या विभाजनानंतर प्रथमच होतेय निवडणूक
ठाणे  : ठाणे जिल्हा नियोजन समितीच्या ४० सदस्यांच्या निवडणूकीसाठी कार्यक्रम जाहीर करण्यात आला असून १० मे रोजी ही निवडणूक होऊन ११ मे रोजी निकाल जाहीर करण्यात येईल असे अपर जिल्हाधिकारी अनिल पवार यांनी कळविले आहे.
ठाणे जिल्ह्याच्या विभाजनानंतर प्रथमच ही निवडणूक होत असून ३२ सदस्य हे जिल्ह्यातील महानगरपालीकांमधून तर उर्वरित २ नगरपालिका आणि ६ सदस्य हे जिल्हा परिषद क्षेत्रातून निवडले जातील .
२० एप्रिल २०१८ पर्यंत अपर जिल्हाधिकारी, ठाणे किंवा सहायक निवडणूक अधिकारी तथा उपजिल्हाधिकारी (सामान्य) यांच्याकडे नामनिर्देशन पत्र दाखल करता येईल.  छाननीनंतर २३ एप्रिल रोजी वैध नामनिर्देशनपत्रांची यादी प्रसिध्द करण्यात येईल. यावर २७ एप्रिल पर्यंत अपील दाखल करता येईल. ३ मे पर्यंत उमेदवारी अर्ज मागे घेता येईल. आवश्यकता भासल्यास १० मे रोजी निवडणूक घेण्यात  येऊन ११ मे रोजी नियोजन भवन येथे मतमोजणी होईल.
**

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!