मुंबईत आज कॉंग्रेसचा कॅडल मार्च
मुंबई : जम्मू काश्मीर मधील कठुआ येथील आसिफा या ८ वर्षीय बालिकेवर आणि उत्तर प्रदेशातील उन्नाव येथे झालेल्या अमानुष बलात्काराच्या निषेधार्थ काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष राहुल गांधी यांच्या आदेशावरून आणि मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष संजय निरुपम यांच्या नेतृत्वाखाली रविवार दि. १५ एप्रिल २०१८ रोजी संध्याकाळी ६ वाजता मुंबई काँग्रेसतर्फे कॅण्डल मार्च काढण्यात येणार आहे. मुंबईतील जुहू चौपाटी येथील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याजवळ या मार्चचे आयोजन करण्यात आले आहे. मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष संजय निरुपम यांच्यासोबत काँग्रेसचे सर्वस्वी आजी-माजी आमदार, खासदार, नगरसेवक, मुंबई काँग्रेसचे सर्व पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने या मार्चमध्ये सहभागी होणार आहेत, अशी माहिती मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष संजय निरुपम यांनी दिलीय.