डोंबिवलीत बसपाची महारँलीचा झंझावात
डोंबिवली :- भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त बसपाच्या वतीने प्रदेश सचिव दयानंद किरतकर यांच्या नेतृत्वाखाली डोंबिवली शहरात महारँलीचे आयोजन केले होते.युग फाउंडेशनच्या अध्यक्षा कल्पना किरतकर व युगंधर किरतकर देखील सहभागी झाली.

डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त बहुजन समाज पक्षाच्या वतीने संपूर्ण डोंबिवली शहरात महारँलीचे आयोजन करण्यात आले होते. सबपाच्या महाराष्ट्र नगरमधील कार्यालयापासून रँलीस सुरुवात झाली. काल आंबेडकरी जयंतीच्या पूर्वसंध्येला कल्याण- डोंबिवली पालिकेच्या डोंबिवली कार्यालयाच्या आवारात डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळ्याचे अनावरण झाल्यानंतर डोंबिवलीत आबेंडकरी जनतेत चैतन्याचे वातावरण निर्माण झाले.यामुळे बसपाच्या रँलीत असंख्य कार्यकर्ते निळ्या झेंड्याखाली एकवटले होते.शेकडो मोटरसायकल, शेकडो कार तितक्याच रिक्षा महारँलीत सहभागी झाल्या होत्या. डोंबिवलीच्या महाराष्ट्र नगरमध्येमनसेचे विभागप्रमुख विजय शिंदे यांनी रँलीचे स्वागत करुन दयानंद किरतकरांचा सत्कार केला.त्याचप्रमाणे बाबासाहेब आंबेडकर समाजिक संस्थेने किरतकरांचे स्वागत करीत रँलीला पुढील मार्गक्रमणासाठी शुभेच्छा दिल्या.डोंबिवलीतील गोपी टाँकीज, फुले रोड, गांधी रस्ता, कोपर पूल, आयरे रोड , बालभवन, इंदिरा चौक, फडके रोड , बावन चाळ,शहराच्या या भागात जयभीम च्या घोषणा देत रँलीतल्या कार्यकर्ते यांनी परिसर दणाणून सोडला.ठिकठिकाणी किरतकरांचे स्वागत करण्यात आले. तेथे त्यांनी आंबेडकरी जनतेस जयंती निमित्त शुभेच्छा दिल्या.या महारँलीत रवीकिरण बनसोडे, विक्रम मोठे, संजीव इंगळे, महिंद्रा जाधव, राजेश कासारे, सुरेश कुशाळकर, रवी बागुल, लता मोहिते, अजित कदम, राम सुंदर, संजु पवार, संध्या मोटे, सारिका इंगळे, वर्षा भास्कर सहभागी झाले होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *