ना -फेरीवाला क्षेत्र फलकांची फेरीवाल्याकडून दुर्दशा 

घाटकोपर ( निलेश मोरे ) रेल्वे स्थानक , शाळा , रुग्णालय महानगर आदी गर्दीच्या ठिकाणी पालिकेने ना फेरीवाला क्षेत्र विभागून फेरीवाल्यांसाठी एक झोन तयार केले तरी मात्र पालिकेच्या कारवाईला ठेंगा दाखवत फेरीवाले ना फेरीवाला क्षेत्र ठिकाणीच आपले बस्तान मांडताना पुन्हा दिसून येत आहेत . पालिकेने लावलेले फलक फेरीवाल्यांनी तोडून मोडून त्यांची दुर्दशा केली आहे . घाटकोपर पूर्व नीलयोग मॉल समोर रेल्वे स्थानकांच्या बाजूला एन वार्ड पालिकेने ना फेरीवाला क्षेत्राचे लावलेले फलक येथील फेरीवाल्यानी मोडून वाकवले आहे . रेल्वे स्थानकांच्या काही हाकेच्या अंतरावर एन वार्ड पालिकेचे मुख्यालय आहे . वारंवार पालिका कारवाई करून सुद्धा फेरीवाले या कारवाईला ठेंगा दाखवत आपले बस्तान याठिकाणी पुन्हा मांडत आहेत .

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *