आजपासून बेस्ट बसचा प्रवास महागणार 
मुंबई : आजपासून (गुरुवार) बेस्ट बसची भाडेवाढ लागू होणार असल्याने मुंबईकरांचा बस प्रवास महागणार आहे. भाडेवाढीत पहिल्या चार किलोमीटरपर्यंत कोणताच बदल करण्यात आलेला नाही. मात्र चार किलो मीटर नंतर एक रुपयांपासून ते 12 रुपयांपर्यंत भाडेवाढ होणार आहे. तसेच विद्यार्थ्यांच्या बस भाड्यातही वाढ करण्यात आलीय. पासच्या किंमतीतही पहिल्या चार किमीसाठी कोणतेही बदल नाही. त्यापुढे ४० रु. ते ३५० रु भाडेवाढ प्रस्तावित.
अशी असेल भाडेवाढ :   
  • ६ किमीसाठी सध्या भाडे- १४ रु, प्रस्तावित भाडे- १५ रु.
  • ८ किमीसाठी सध्या भाडे- १६ रु, प्रस्तावित भाडे- १८ रु.
  • १० किमीसाठी सध्या भाडे- १६ रु, प्रस्तावित भाडे- २२ रु.
  • शालेय विद्यार्थ्यांच्या पास किंमतीत चार किमीपर्यंत बदल नाहीत, त्यापुढे ५० ते १०० रु वाढ प्रस्तावित.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *