कल्याणच्या बोगद्यात जीवघेणे हल्ले नागरिकांचे उपोषण

डोंबिवली :-(शंकर जाधव)  कल्याण पूर्वेतील कोळशेवाडी परिसरात स्टेशन जवळील बोगद्यात विनोद सुर्वे नावच्या प्रवाश्याची लुटीच्या उद्देशाने हत्या करण्यात आली होती. याप्रकरणी पोलिसांनी सुर्वे यांची हत्या करणाऱ्या तीन मारेकऱ्यांना अटक केली. मात्र या बोगद्यात अनेक प्रकार घडत असतात ते त्वरित थांबले पाहिजे यासाठी कल्याणच्या काही नागरिकानी बोगाद्यासमोर एक दिवसीय लाक्षणिक उपोषण केले . या उपोषणात शेखर केदारे, सुमेध हुमणे आणि भारत सोनावणे यांनी सहभाग घेतला. स्काय वॉक वरील सीसीटीव्ही बसवणे, बोगदा व बोगद्याजवळील परिसरात रेल्वे पोलिसांची गस्त वाढवणे आणि अपूर्ण स्काय वॉक चे काम लवकरात लवकर पूर्ण करण्यात यावे  या तीन मागण्या घेऊन यांनी हे उपोषण केले. या उपोषणाला स्थानिकांनी व प्रवाश्यांनी चांगला प्रतिसाद दिला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *