मुंबई महापालिकेच्या पोटनिवडणुकीत शिवसेनेने गड राखला  
मुंबई : मुंबई महापालिकेच्या  प्रभाग क्रमांक 173 च्या पोटनिवडणुकीत शिवसेना उमेदवार रामदास कांबळे हे विजयी झालेत. काँग्रेस उमेदवार सुनील शेट्ये यांना जोरदार टक्कर देत ८४५ मतांनी विजय मिळवला. कांबळे यांना ६६१६ तर शेट्ये यांना  ५७७१ मते मिळाली.
शिवसेनेचे नगरसेवक प्रल्हाद ठोंबरे यांच्या निधनानंतर प्रभाग क्रमांक १७३ ची जागा रिक्त झाल्याने इथे पोटनिवडणूक घेण्यात आली होती. या प्रभागात शुक्रवारी मतदान पार पडलं होत. या पोटनिवडणुकीत भाजपने उमेदवार उभा केला नव्हता तर
शिवसेनेच्या विरोधात काँग्रेसने शिवसेनेच्या कार्यकर्त्याला उमेदवारी दिली होती.
अशी मिळाली मते 
प्रतीक्षा नगर पोटनिवडणूकीत शिवसेनेचे उमेदवार रामदास कांबळे यांना ६६१६ मते मिळाली तर विरूध्द कॉंग्रेसकडून लढलेल्या सुनील शेट्टी यांना ५७७१ मते मिळाली. भारीप बहूजन महासंघाचे गौतम झेंडे यांना ५४९ मते मिळाली तर २३४ मते नोटाला पडली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *