डोंबिवलीचे सुभाष महाजन हे राज्य शासनाकडून राष्ट्रीय उत्कृष्ट समाजसेवक गौरव पुरस्काराने सन्मानित 
डोंबिवली : राज्य शासनाच्या पर्यटन सांस्कृतिक कला महोत्सव समिती यांच्यावतीने डोंबिवलीतील ज्येष्ठ समाजसेवक व बँक कर्मचारी सेनेचे नेते  सुभाष महाजन याना राष्ट्रीय उत्कृष्ट समाजसेवक गौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आलंय. कोल्हापूर जिल्हा पर्यटन सांस्कृतिक कला महोत्सव आंतरभारतीय लोककला साहित्य संमेलन २०१८ च्या पुरस्कार सोहळ्यात हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. महाजन हे विविध विविध संस्था आणि संघटनेवर तसेच शासकीय कमिटीवर कार्यरत आहेत. काही दिवसांपूर्वीच भारत सरकारच्या भारतीय सांस्कृतिक संबंध परिषदेची आजीव मेंबरशिप त्यांना प्रदान करण्यात आलीय. तसेच मराठी वृत्तपत्रलेखक संघ यांच्या वतीने देण्यात येणार यंदाचा ‘ पत्रभूषण २०१८ ‘ या पुरस्काराने त्यांना सन्मानित करण्यात आलंय. महाजन यांना राष्ट्रीय उत्कृष्ट समाजसेवक गौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आल्याने सर्वच स्थरातून त्यांचे अभिनंदन होत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *