रन फॉर स्पिरिट ….  कर्णबधीर आणि मूकबधीर मुलेही धावली 
डोंबिवली : जनहित प्रतिष्ठान व ओमकार संस्थेमार्फत रन फॉर स्पिरिट २०१८ चे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये कर्णबधीर  व मूकबधीर मुलांनी सहभाग घेतला . प्रथम पाच विजेत्यांना आकर्षक बक्षिसे सन्मानचिन्ह व प्रमाणपत्र देण्यात आली .
या स्पर्धेत ७५ जण सहभागी झाली होती.त्याच बरोबर हेल्पीग हॅन्ड, आधार इंडिया, जागृती प्रतिष्ठान आणि दोस्ताना गृप, ऋणानुबंध या संस्थेचे  सहकार्य लाभले. यावेळी जनहित प्रतिष्ठान चे अध्यक्ष महेश काळे, आधार इंडियाचे संस्थापक अमित दुखंडे, विष्णु नगर पोलीस स्टेशन पोलीस उपनिरीक्षक  केदारे ,हेल्पीग हॅन्डचे, समिर चव्हाण, जागृती प्रतिष्ठान चौधरी, डोंबिवली एकता मंच नवीन भाई, अभय दुबे, मंगेश हेगडे, संजय गोरे, संदीप कलबटे , अनिरुद्ध कुलकर्णी आदीउपस्थित होते.
 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!