कॉंग्रेस–राष्ट्रवादीकडून अल्पसंख्यांकाचा वोटबँकसाठीच वापर –– जमाल सिद्धिकी यांची टीका
डोंबिवली :- भाजप अल्पसंख्याक मोर्चा महाराष्ट्रच्या वतीने डोंबिवलीतील आलेल्या अल्पसंख्याक सवांद यात्रेचे होरीझोन सभागृहात जैन समाजाने स्वागत केले. या समारोह सभेत भाजप अल्पसंख्याक मोर्चा प्रदेश अध्यक्ष जमाल सिद्धिकी यांनी कॉंग्रेस – राष्ट्रवादीने अल्पसंख्यांनाचा वापर वोटबँक समजून केला असून त्यांना विकासापासून वंचित ठेवल्याची टीका केली.
या सभेत अल्पसंख्यांक मोर्च्याचे महामंत्री एजाज देशमुख, कार्यालय मंत्री फारूक मंत्री, आयोजक तथा विशेष निमंत्रित सदस्य महेंद्र गांधी, मदन खत्री, जैन समाजाचे राकेश कोठारी, राजेश रुपावत, श्रीपाल जैन, सिकंदर रोख, नगरसेविका सायली विचारे, डॉ. सुनिता पाटील, संजय विचारे, शशिकांत कांबळे , राविसिंग ठाकूर, सुरेखा पांडे, यांसह यावेळी मोर्च्याचे प्रदेश व जिल्हा पदाधिकारी उपस्थित होते.यावेळी भाजप अल्पसंख्याक मोर्चा प्रदेश अध्यक्ष जमाल सिद्धिकी म्हणाले, कॉंग्रेस – राष्ट्रवादीच्या सत्तेत जैन समाजला विकासापासून लांब ठेवण्यात आले होते. मात्र भाजप सत्तेत जैन समाजाला न्याय मिळाला.यावेळी श्री भैरव भक्ती संध्याचे आयोजन करण्यात आले होते. सभेचे सूत्रसंचालन कार्यालय मंत्री फारूक पठान यांनी केले.