रेल्वेच्या डीआरएमकडून कर्जत रेल्वे स्थानकातील  समस्याची पाहणी 

कर्जत (राहुल देशमुख) : कर्जत रेल्वे स्थानकला आज मुंबई विभागीय रेल्वे व्यवस्थापक संजयकुमार जैन यांनी भेट देऊन रेल्वे स्थानकातील समस्यांची पाहणी केली व समस्या सोडविण्याचे आश्वासन दिले. कर्जत रेल्वे पॅसेंजर असोसिएशनचे अध्यक्ष केतनभाई शाह यांनी  केलेल्या मागणीनंतर त्यानी ही भेेट दिली. यावेळी  कर्जत रेल्वे पॅसेंजर असोसिएशनचे अध्यक्ष केतनभाई शाह, कर्जत रेल्वे स्थानक प्रबंधक  वर्मा, रेल्वेचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

काय मिळणार कर्जतकरांना

मुंबई दिशेकडील पादचारी पुल फलाट क्रमांक तीनला जोडण्यात येईल, फलाट क्रमांक दोन व तीनवर निवाराशेड बांधण्यात येतील, भिसेगाव दिशेकडील तिकिट खिडकी काही कारणास्तव संपुर्ण वेळ सुरु ठेवता येणे अशक्य असल्यामुळे पर्यायी व्यवस्था म्हणुन मुंबई दिशेकडील पादचारी पुलावर तिकिट एव्हीएम मशीन बसविण्यात येईल तसेच सदर पादचारी पुलावर डिजिटल इंडिकेटरस व पादचारी पुलावर उदघोषना ऐकु येण्याकरता स्पिकर लावण्यात येतील तसेच रेल्वे स्थानकात फलाट क्रमांक दोनवरील सरकत्या जिन्याव्यतिरीक्त  आणखी दोन सरकते जिने मंजुर करण्यात आले तसेच मुख्य तिकिट खिडकी जवळील तिकिट एव्हीएम मशीन मुख्य पादचारी पुलासमोरील मोकळ्या जागेत स्थलांतरीत करण्यात येईल आदी आश्वासने  विभागीय रेल्वे व्यवस्थापकानी दिले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *