मुंबईकरांची पसंती ऑनलाइन सेवेला ! ७४ हजारांची संख्या पोहचली ४ लाखावर : ९७ टक्के भरणा ही ऑनलाइन
मुंबई : महापालिकेद्वारे देण्यात येणा–या विविध नागरी सेवा सुविधाशी संबंधित अर्ज, नोंदणी, नूतनीकरण इत्यादींसाठी नागरिकांच्या महापालिकेतील फे–या कमी होण्याच्या उद्देशाने पालिकेने ‘ऑनलाईन‘ प्रक्रिया केलीय. पालिकेच्याऑनलाइन सेवेला मुंबईकरांची चांगलीच पसंती मिळालीय. मागील वर्षी केवळ ७४ हजार ५११ अर्जदारांनी ‘ऑनलाईन‘ पद्धतीने अर्ज केले होते. या संख्येत यावर्षी म्हणजेच १ एप्रिल २०१७ ते २८ फेब्रुवारी २०१८ या अकरा महिन्यांच्या कालावधीत तब्बल ४५१ टक्यांची वाढ होऊन ही संख्या आता ४ लाख १० हजार ५२५ वर पोहचली आहे. विशेष म्हणजे सेवा सुविधांपोटी महापालिकेला प्राप्त होणा–या एकूण शुल्कापैकी तब्बल ९७ टक्के शुल्क हे ऑनलाईन पद्धतीने तर केवळ ३ टक्के शुल्क हे जुन्या पद्धतीने प्राप्त झाले आहे. जुन्या पद्धतीने (ऑफलाईन) पद्धतीने अर्ज करणा–यांच्या संख्येत लक्षणीय घट झाली आहे. गेल्यावर्षीच्या ५ लाख ३ हजार ८३७ च्या तुलनेत या वर्षी २५ हजार ८६ झाली आहे.
मनपाद्वारे नागरिकांना देण्यात येणा–या नागरी सेवा सुविधांविषयीची कार्यवाही अधिक गतिमान व अधिकाधिक पारदर्शक होण्याच्या उद्देशाने ‘ऑनलाईन‘ प्रशासकीय प्रक्रिया करण्यावर महापालिका प्रशासनाचा भर आहे. यावर्षी २८ सेवा सुविधांशी संबंधित प्रक्रिया आतापर्यंत ऑनलाईन करण्यात आलीय. यामध्ये प्रामुख्याने शॉप लायसन्स, विवाह नोंदणी, चर खोदणे, आरोग्य परवाने, व्यवसाय परवाने,जाहिरात अनुज्ञाप्ती, नवीन कारखाना परवाना, जल जोडणी, अग्निशमन दलाचे ना हरकत प्रमाणपत्र, शिक्षण खात्याशी संबंधित अर्ज, विषयक पाण्याचा टँकर, मृत्यु प्रमाणपत्र, नवरात्री व गणेशोत्सव संबंधी परवानग्या, चित्रीकरण परवानग्या इत्यादी बाबींचा समावेश आहे. या सुविधा महापालिकेच्या www.mcgm.gov.in
कशी आहे अर्जाची संख्या..
१ एप्रिल २०१७ ते २८ फेब्रुवारी २०१८ या अकरा महिन्याच्या कालावधीत सर्वाधिक म्हणजे २ लाख १२ हजार ३२३ ऑनलाईन अर्ज हे दुकान परवान्याच्या नूतनीकरणासाठी असणा–या ‘शॉप फॉर्म– बी‘ अंतर्गत प्राप्त झाले आहेत. तर याच कारणासाठी ऑफलाईन अर्ज करणा–यांची संख्या ३९ एवढी आहे. याखालोखाल नवीन दुकानाच्या नोंदणीसाठी असणा–या ‘शॉप फॉर्म – ए‘ करिता १ लाख १२ हजार ४८९ ऑनलाईन अर्ज; तर याच कारणासाठी केवळ एक ऑफलाईन अर्ज प्राप्त झाला आहे. विवाह नोंदणीसाठी ४९ हजार ६४९ ऑनलाईन अर्ज; विशेष म्हणजे यासाठी एकही ऑफलाईन अर्ज प्राप्त झाला नाही. दुकानाच्या किंवा दुकान मालकाच्या नावात बदल करण्यासाठी असलेल्या ‘शॉप फॉर्म – इ‘ करिता २९ हजार १७७ ऑनलाईन अर्ज; तर याच कारणासाठी ७८ अर्ज जुन्या पद्धतीने प्राप्त झाले आहेत. चर खोदण्यासाठीचे सर्वच अर्ज ऑनलाईनच स्वीकारले जातात; यानुसार ३ हजार ८३१ अर्ज प्राप्त झाले आहेत. त्याचबरोबर आरोग्य परवाने, व्यापार परवाने, कारखाना परवाना, वॉटर टँकर, होर्डिंग लायसन्स,जाहीरात परवाना, श्वान परवाना इत्यादी बाबींसाठी देखील मोठ्या प्रमाणात ऑनलाईन अर्ज प्राप्त झाले आहेत.
——-
[…] बुद्धांच्यागुगल इंटरनेट वर आपल्याला अनेक bhagwan gautam buddha images सापडतील. […]