ऐनवेळी लोकल रद्द : नायगाव प्रवाशांचा रेल रोको
मुंबई : नायगाव स्थानकातून सकाळी ७.५० ला सुटणारी वसई-अंधेरी लोकल ऐन वेळेस रद्द करण्यात आल्याने संतप्त झालेल्या प्रवाशांनी ट्रॅकवर उतरुन रेलरोको केल्याने पश्चिम रेल्वेची वाहतूक विस्कळीत झाली आहे. या गोंधळामुळे कामावर जाण्यासाठी निघालेल्या चाकरमन्यांना त्रास सहन करावा लागला. रेल्वे प्रशासनाकडून लोकल रद्द झाल्याची कोणतीही सुचना न मिळाल्याने प्रवासी खूपच संतापले होते त्यांनी रेल्वे प्रशासनाविरोधात जोरदार घोषणाबाजी केली. अखेर पोलिसांनी प्रवाशांची मनधरणी केल्यानंतर तब्बल एक तासानंतर लोकलसेवा पूर्ववत झाली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *