मनसे पदाधिकाऱ्याला मारहाण, घटना सीसीटीव्हीत कैद 

डोंबिवली :- महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचे उपजिल्हा अध्यक्ष समीर पालांडे यांना  दोन अनोळखी इसमांनी मारहाण केल्याचा प्रकार घडलाय. ही घटना मध्यरात्री दीडच्या सुमारास घरात शिरताना घडली. विशेष म्हणजे हा सर्व प्रकार सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झालाय. याप्रकरणी विष्णूनगर पोलीस ठाण्यात अदखलपात्र गुन्ह्याची नोंद करण्यात आलीय. डोंबिवली पश्चिमेकडील महात्मा फुले रोडवरील दोन पाण्याच्या टाकीजवळील कुलस्वामिनी इमारतीत पालांडे राहतात. सोमवारी मध्यरात्री रात्री दीडच्या सुमारास ते घरी आले. आपल्याकडील चावीने घराचा लैच उघडत असतानाच हा प्रकार घडला.
https://youtu.be/nzTHqPq9R-E

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *