महिला पत्रकारांचा महापौरांच्या हस्ते सत्कार

मुंबई : जागतिक महिला दिनानिमित्‍त मुंबई महापालिकेचे वृत्‍तसंकलन करणाऱया महिला प्रसारमाध्‍यम प्रतिनिधींचा महापौर प्रिं. विश्‍वनाथ महाडेश्‍वर यांच्‍या हस्‍ते आज पुष्‍पगुच्‍छ व भेटवस्‍तु देऊन महापालिका मुख्‍यालयातील महापौर दालनात सत्‍कार करण्‍यात आला. पत्रकार इंद्रायणी नार्वेकर, निर्मला ढेपे, रिचा पिंटो, स्विटी आदिमुलम, स्‍टेफी थेवर, सुजाता ठाकुर, अनिता शुक्‍ला, राधिका यादव, सपना देसाई, मनश्री पाठक व उनाईजा या प्रतिनिधींचा समावेश होता.

यावेळी महापौर म्‍हणाले की, आजच्‍या युगात महिलांची भूमिका महत्‍वपूर्ण असून, आपण महिला प्रसारमाध्‍यम प्रतिनिधी म्‍हणून समाजात खूप मोठी भूमिका पार पाडीत असल्‍याचे महापौरांनी सांगितले. तसेच आपल्‍या ज्ञानाच्‍या कक्षा अधिक रुंदावण्‍यासाठी अधिकाअधिक दर्जेदार पुस्‍तकांचे वाचन करण्‍याची सुचनाही यावेळी महापौरांनी केली. याप्रसंगी विधी समिती अध्‍यक्ष अॅड. सुहास वाडकर, जनसंपर्क अधिकारी विजय खबाले- पाटील, महापालिका वार्ताहर संघाचे अध्‍यक्ष विष्‍णु सोनावणे, सरचिटणीस श्रीरंग सुर्वे व महापालिका चिटणीस प्रकाश जेकटे आदी मान्‍यवर उपस्थित होते.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *