राज ठाकरेंचं नवं व्यंगचित्र, स्वाभिमानवरून उध्दव ठाकरे, संजय राऊतांची उडवली खिल्ली

मुंबई : चंद्राबाबू नायडू यांनी एनडीएला रामराम ठोकल्याच्या मुद्दयावरून मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी व्यंगचि़ रेखाटलय. मात्र या व्यंगचित्रातून राज ठाकरेंनी शिवसेना प्रमुख उध्दव ठाकरे आणि संजय राऊत यांच्यावर निशाना साधत स्वाभिमान वरून चांगलीच खिल्ली उडवलीय.

‘स्वाभिमान विरुद्ध स्वाभिमान!’ असे या व्यंगचित्राचा विषय आहे. उद्धव ठाकरे, चंद्राबाबू नायडू आणि संजय राऊत हे व्यंगचित्रात दाखवण्यात आले आहे. तर खिडकीतून मोदी पाहत असल्याचे दिसत आहेत. उद्धव ठाकरे चंद्राबाबूंकडे पाहत म्हणतात, “हॅss.. यात कसला आलाय ‘मर्द’पणा? त्यांना म्हणावं हिम्मत असेल तर सरकारमध्ये राहून, अपमान गिळून वर सरकारला धमक्या देऊन दाखवा!” राज्याच्या सत्तेतून बाहेर पडण्याची धमकी शिवसेनेने आजपर्यंत अनेक वेळा दिली. त्याच अनुषंगाने राज ठाकरेंनी हे व्यंगचित्र रेखाटले आहे. त्यामुळे राज ठाकरेंचं हे व्यंगचित्र राजकीय वर्तुळात चांगलंच चर्चेच बनल असून शिवसेना काय प्रतिउत्तर देतेय याकडे लक्ष वेधलय.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *