अंबरनाथमधील क्रुर घटना ….पोलिसांच आवाहन
अंबरनाथ : अंबरनाथ टिटवाळ रस्त्यावरील नालिंबी परिसरातील सोमवारी रात्री प्रियकाराची हत्या करून प्रेयसीवर बलात्कार करण्यात आल्याची क्रूर घटना घडली या घटनेने पोलीस यंत्रणेची झोप उडालीय. याच्या तपासासाठी ३ पथक तयार करण्यात आली आहेत अशी माहिती पोलिसांकडून मिळाली.
अंबरनाथहून नालिंबीमार्गे टिटवाळ्याला जाणाऱ्या रस्त्याच्या दुतर्फा घनदाट जंगल आहे. रस्त्याच्या दोन्ही बाजूला झाडझुडप आणि भयाण शांतता असल्याने एकांत मिळावा यासाठी अनेक प्रेमीयुगल या ठिकाणी येतात. या प्रकारानंतर पोलीस यंत्रणा चक्रावून गेलीय. ओसाड असलेल्या ठिकाणी अनेक प्रेमीयुगली येत असतील अनेकांसोबत लुटमारीच्या घटनाही घडलया असतील मात्र बदनामीच्या भितीने कोणीही पोलीसात तक्रार केलेली नाही. त्यामुळे असा प्रकार कोणाच्या बाबतीत घडला असेल तर त्यांनी पोलिसांनी माहिती द्यावी त्यांची ओळख गुप्त ठेवण्यात येईल असं आवाहन पेालिसांकडून करण्यात आलय.
कसा घडला प्रकार ..
सोमवारी रात्री गणेश दिनकर हा दुचाकीवरून आपल्या प्रेयसीबरोबर त्या ठिकाणी आला होता. झाडाच्या अडोशाला दोघेही बसले होते. त्याचवेळी आलेल्या दोन लुटारूंनी त्याच्याकडे दुचाकीची चावी व पैशाची मागणी केली. मात्र गणेशने नकार देताच त्याच्यावर तीन गोळया झाडण्यात आल्या. व प्रेयसीवर बलात्कार करून चोरटे पसार झाले. गणेश हा शहापूर येथेील रहिवाशी असून अंबरनाथला तो एका चायनीजच्या दुकानात काम करीत होता. त्याची प्रेयसी कल्याणला राहते.