छिदमच्या गच्छंतीनंतर उपमहापौरपदी शिवसेनेचे बोरूड
अहमदनगर : अहमदनगर महापालिकेच्या उपमहापौरपदी शिवसेनेच्या अनिल बोरुडे यांची बिनविरोध निवड झालीय. छिंदममुळे पक्षाचीही बदनामी झाल्याने भाजपने निवडणूक लढवली नाही. राष्ट्रवादी काँग्रेसने निवडणुकीतून माघार घेतल्यामुळे बोरुडे यांची बिनविरोध निवड झाली.
छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल बेताल वक्तव्य करणाऱ्या श्रीपाद छिंदमला गेल्या महिन्यात उपमहापौरपदावरुन निलंबित करण्यात आलं होतं. त्यामुळे अहमदनगरचं उपमहापौरपद रिक्त होतं. 16 फेब्रुवारीला श्रीपाद छिंदम याला पोलिसांनी अटक केली होती. अखेर शिवसेनेचे अनिल बोरूडे बिनविरोध निवडून आलेत.